भैरवनाथ महिला भजनी मंडळाची स्थापना आध्यात्मिकदृष्ट्या गरजेची -डॉ.स्वाती पाटील
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी इथं श्री भैरवनाथ महिला भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महिला भजनी मंडळाची स्थापना संजीवनी सखी मंच च्या सर्वेसर्वा डॉ. स्वाती पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
या स्थापनेवेळी डॉ. पाटील म्हणाल्या कि, सध्या च्या आधुनिक युगात आध्यात्माची देखील गरज आहे. या भजनी मंडळाच्या स्थापनेमुळे देव, देश आणि संतांची परंपरा जोपासली जात आहे. संतांच्या अनेक शिकवणी आपल्यला आपले जीवन जगताना उपयोगी येतात.
श्री भैरवनाथ महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष सुमन रंगराव शेळके, उपाध्यक्ष सुवर्णा अंबाजी शेळके, सचिव आशा रामचंद्र शेळके आहेत. यांच्यासोबत गावातील अनेक महिला या भजनी मंडळात सहभागी आहेत. यावेळी डॉ.स्वाती पाटील यांनी रामचंद्र शेळके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.