भ्रष्ट दुकानदारास शासन, तर चांगल्यांचे अभिनंदन : अरविंद माने
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील सर्वच रेशन दुकानदार भ्रष्ट नसून, चांगले दुकानदार सुद्धा आहेत. जे दुकानदार जनतेशी प्रामाणिक रहात, त्यांना व्यवस्थित धान्य वितरीत करीत आहेत, अशा प्रामाणिक रेशन दुकानदारांचे माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद माने यांनी अभिनंदन केले आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी तहसीलदार गुरु बिराजदार यांना दिले आहे. अशी माहिती अरविंद माने यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
तालुक्यातील रेशन दुकानदार सगळेच चुकीचे नाहीत. कारण काहीवेळा लाभार्थी ग्राहकांना नियम माहित नसतात. त्यामुळे सुद्धा गैरसमज पसरत आहे. काही मंडळी जरी चुकीची वागली, तरी सगळी यंत्रणा चुकीची आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. चुकीचं वागणाऱ्या लोकांना त्यांची चूक जाणवून द्या, त्यांची त्वरित चौकशी करावी, त्यांचे परवाने रद्द करावेत, तर चांगलं काम करणाऱ्या रेशन दुकानदाराचे अबिनंदन केले पाहिजे, असेही अरविंद माने यांनी निदनाद्वारे सांगितले आहे.
या निवेदनावर अरविंद माने, कृष्णा बागम (अमेणी ), शरद चौगुले ( शिवारे ),
चेतन सुतार ( आकुर्ले ), कृष्णा पाटील सरपंच ( विरळे ) आदी मान्यवरांच्या सह्या आहेत.