मनसे ची ” गाव तिथे शाखा ” मिशन ला वरेवाडी पासून सुरुवात
बांबवडे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने वरेवाडी इथं नव्या शाखेचं उद्घाटन कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मनसे खऱ्या अर्थाने समाजकारणात उतरत असल्याचे हे, पहिले पाऊल आहे. गाव तिथे मनसे शाखा हा काटकर आणि मनसे सहकारी यांनी सुरु केलेले मिशन मनसे शाखा ला सुरुवात झाली आहे.

यावेळी सहकार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे यांच्या हस्ते शाखा अध्यक्ष अंकुश भोसले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम, तालुका उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, प्रदीप भोसले, सुरज भोसले, विशाल खुटाळे, भिकाजी भाकरे, बांबवडे शहर अध्यक्ष विजय परीट, शाहुवाडी विभाग अध्यक्ष मंगेश घोडके व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.