मनसे च्या प्रदीप वीर यांच्या वाढदिवसानिमित्त करुंगळे इथं रक्तदान शिबीर संपन्न
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : शाहुवाडी तालुक्यातील करूंगळे इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करुंगळे विभागप्रमुख प्रदीप वीर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

मनसे च्या वतीने हे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरास महात्मा गांधी हॉस्पिटल ब्लड सेंटर, नवे पारगाव यांनी सहकार्य केले. रक्तदान शिबिरात सुमारे ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

मनसे चे कार्यकर्ते नेहमीच सामाजिक उपक्रमांनी आपले वाढदिवस साजरे करतात.
या सामाजिक उपक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष सर्वश्री युवराज काटकर , मनसे तालुकाध्यक्ष – धनाजीराव आगलावे, रायगड जिल्हा सचिव – जयसिंग पाटील, सामाजिक कार्यकर्ते रमेश पडवळ, एन.बी. पाटील, सरपंच माधव कळंत्रे, आनंदा वारंग, बाजीराव वारंग, पोलीस पाटील वीरसाहेब, मनसे तालुका उपाध्याक्ष- प्रवीण कांबळे, उपविभाग अध्यक्ष शिवाजी फिरके, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष – अक्षय खेडेकर, डॉ.झुंजार माने, दिलीप वीर, सतीश सोनावळे, प्रमोद पाटील, कोपार्डे उपसरपंच दत्ताबापू वारकरी, रुपेश जामदार, सागर माने, कडवे ग्रा.पं.सदस्य भारत पाटील, व करुंगळे शाखा पदाधिकारी व सर्व मनसे सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.