मराठी तरुणाची व्यावसायिक झेप : फ्रेंड्स मोबाईल शॉपी
बांबवडे : मराठी तरुणांनी व्यवसायात उतरण्यास सुरुवात केली आहे. नोकरी दुय्यम ठरवून आज मराठी तरुण व्यवसायात दिसू लागले आहेत. हि मराठी समाजासाठी अभिमानाची बाब आहे. बांबवडे येथील फ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक अमोल कुमार लाटकर या तरुणाच्या व्यवसायातील वाटचालीवरून हे नाविन्य दिसून येत आहे.

एकेकाळी मितभाषी असलेले अमोल लाटकर , आज व्यवसायात यशस्वीपणे वावरत आहेत. सुरुवातीला फक्त रिचार्ज करून देणारे अमोल लाटकर सध्या स्वत: चे ” फ्रेंड्स मोबाईल शॉपी ” बांबवडे ता.शाहुवाडी इथं यशस्वीपणे चालवीत आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवसायात गरुड झेप घेतल्याचे हे प्रमाण आहे. त्यांच्या मोबाईल शॉपी मध्ये विविध कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध आहेत. विवो, रेड मी , अॅपल, ओप्पो, एमआय,सॅमसंग, आदी कंपन्यांचे स्मार्ट फोन,तसेच साधे फोन सुद्धा उपलब्ध आहेत.

ते फोन खरेदी करण्यासाठी आर्थिक पतपुरवठा करण्यासाठी बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडीट यांसहित अनेक कंपन्या उपलब्ध आहेत. या खरेदी वर १० ते ४० % पर्यंत डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर श्रींच्या मोबाईल फोन खरेदीवर सौं ना पैठणी फ्री देण्याचा संकल्प फ्रेंड्स शॉपी चे मालक अमोल लाटकर यांनी केला आहे.

एका मराठी तरुणाची हि व्यावसायिक झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या वाटचालीस साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने खूपखूप शुभेच्छा
अमोल लाटकर : संपर्कासाठी क्र.९५०३७७४४४४.