मलकापूर इथं ब्रेक फेल ट्रक ची दोन वाहनांना धडक
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : मलकापूर तालुका शाहुवाडी इथं आज सकाळी एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने दोन वाहनांना धडक बसली.यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत शाहुवाडी पोलीस ठाण्यात तक्रार झाली आहे.

आज सकाळ च्या दरम्यान एक ट्रक कोल्हापूर हून रत्नागिरी दिशेला जात होता. मलकापूर येथील गणपती मंदिर च्या जवळ आल्यानंतर ट्रक चा ब्रेक फेल झाला, आणि ट्रक ने स्कॉर्पीओ ला धडक दिली, तसेच एका रिक्षा ला देखील धडक बसली. या अपघातात ट्रक क्र. MH-13- CU- 8477 याने ब्रेक फेल झाल्याने स्कॉर्पीओ क्र. MH-09-AZ-8764 तसेच रिक्षा क्र. MH-09-EL-1795 ला देखील धडक बसली.

या दरम्यान ट्राफिक जम झाले होते. दरम्यान शाहुवाडी चे पोलीस निरीक्षक विजय पाटील घटनास्थळी दाखल झाले, आणि ट्राफिक सुरळीत केले.
या घटने दरम्यान ट्रक चा ड्रायव्हर व क्लीनर फरार झाले.