मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. तराळ यांना ५००० रु. ची लाच घेताना रंगेहाथ अटक
बांबवडे प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष अरुण तराळ वय ३८ वर्षे राहणार मुळ कुरुंदवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे यांनी ५००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. याबाबत ची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभाग कडे करण्यात आली होती.

याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, मलकापूर येथील तक्रारदार ३१ मे रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या सेवानिवृत्ती लाभांचा प्रस्ताव पुणे कार्यालयांकडून मंजूर होवून आल्यानंतर, पुढील कार्यवाही करणेसाठी तसेच इतर प्रलंबित असलेली पुरवणी बिले विनात्रूटी पुढे पाठविण्यासाठी ५००० रुपये , व वरिष्ठांच्या सेवानिवृत्ती च्या निरोपसमारोप कार्यक्रमासाठी ७००० रुपये असे एकूण १२००० रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती.

यापैकी आज दि. ३१ मे रोजी डॉ. तराळ यांनी सेवा निवृत्ती च्या कामासाठी ५००० रुपये मागितले. ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.


या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे चे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, सुरज गुरव, पोलीस उप अधीक्षक कोल्हापूर चे आदिनाथ बुधवंत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहा. उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पो.ना. विकास माने, सुनील घोसाळकर, पो.कॉ. रुपेश माने, पो.हे.कॉ. सुरज अपराध आदी पोलीस कर्मचारी सहभागी होते.

दरम्यान डॉ. तराळ यांच्याविरोधात रुग्णांकडून अनेक तक्रारी ऐकावयास मिळत होत्या. रुग्णालयात आलेल्या रुग्णांमध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव देखील केला जात होता, असे समजते.