सामाजिक

मलकापूर च्या ” रिध्दी मोबाईल ” मध्ये लकी ड्रॉ ऑफर सहित आकर्षक गिफ्ट सुद्धा


मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील एकमेव नगरपरिषद असलेले शहर मलकापूर. तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ आहे. इथंच जुन्या एसटी स्टँड समोर असलेले ” रिध्दी मोबाईल शॉपी ” मध्ये आपल्याला तरुणांच्या कर्तुत्वाचा नमुना पहायला मिळतो. अगदी रिचार्ज सेंटर पासून, दुरुस्ती ते मोबाईल विक्री पर्यंत या तरुणाने मजल मारली आहे. एकेकाळी मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. त्याने फक्त नोकरीच करायची, हा जो समज होता, तो श्री. लक्ष्मण खाके या तरुणाने देखील पुन्हा चुकीचा ठरवला आहे.


मलकापुरातील रिध्दी मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल दुरुस्ती केली जातेच, त्यासोबतच नवीन मोबाईल विक्री सुद्धा विश्वासाने केली जाते. २००९ मध्ये सुरु केलेला हा व्यवसाय गेल्या १३ वर्षात नावारूपाला आला आहे. इथं Vivo, OPPO, Redme, Realmi , 1 Plus, i Fone यांच्यासहित SAMSUNG, सारख्या ब्रांडेड कंपनी चे मोबाईल फोन देखील आपल्याला विक्री साठी उपलब्ध आहेत. यासोबत सेकंड हँड मोबाईल देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.


तेंव्हा पंचक्रोशीतील ग्राहकांनी या रिध्दी मोबाईल शॉपी ला आपली पसंती दर्शवली आहे. तुम्ही सुद्धा एकवेळ या शॉपी ला भेट द्या. सध्या दिपावली ची भव्य लकी ड्रॉ ऑफर सुरु असून, ७०००/- ते २००००/- रुपये किमतीच्या मोबाईल फोन खरेदीवर १०० % आकर्षक गिफ्ट ठेवण्यात आले आहे. २००००/- रु. किमतीच्या वरील कोणताही फोन खरेदी केल्यास एक मोबईल फोन मोफत देण्यात येणार आहे. यासोबतच विविध बक्षीस योजना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.


पहिले बक्षीस ४०००/- रु.ची पैठणी, दुसरे बक्षीस २५००/- रु.चा मिक्सर, तिसरे बक्षीस १५००/- रु.ची इस्त्री, चौथे बक्षीस १२००/- रु.चे इअरबर्ड, पाचवे बक्षीस ९९९/- रु.चा कीपॅड मोबाईल, अशी बक्षिसे रिध्दी मोबाईल शॉपी च्यावतीने जाहीर करण्यात आली आहेत. यासोबतच Redmi A1 च्या मोबाईल खरेदीवर १० % डिस्काऊंट देखील देण्यात येत आहे. हि ऑफर मर्यादित काळासाठी आहे. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री.लक्ष्मण खाके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले.


याचसोबत मोबाईल खरेदीसाठी फायनान्स त्वरित उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी Bajaj Finance, TVS Credit, Home Credit, SAMSUNG Finance आदी कंपनी फायनान्स उपलब्ध करून देतात. व आपल्याला मोबाईल सुलभ हफ्त्यांमध्ये देखील खरेदी करता येतो.
इथं सर्व प्रकारच्या कंपन्यांचे मोबाईल फोन चे विविध मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सुरुवातील रिचार्ज सेंटर पासून सुरु केलेला व्यवसाय आता चढत्या आलेखाला लागला आहे. यासाठी लागणारी उर्जा, कष्ट सोसण्याची मानसिकता श्री लक्ष्मण खाके यांच्याकडे आहे.
अधिक माहिती साठी या 9765595418 या मोबईल क्र. वर संपर्क साधावा, असे देखील श्री खाके यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!