मलकापूर नगरपरिषद च्यावतीने निर्जंतुकीकरण तर ‘ पोलीस, आरोग्य ’ साठी कृतज्ञता
बांबवडे : उचत तालुका शाहुवाडी इथं कोरोना बाधित तरुण निष्पन्न झाल्याने, तालुक्यात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. शासनाला सहकार्य करण्यास तालुका तयार असल्याची माहिती मिळत आहे.
उचत पासून तीन किलोमीटर चा परिसर सील करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मलकापूर नगरपरिषद च्यावतीने परिसर निर्जंतुक करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी प्रभागात फिरून माहिती घेत आहेत.
सध्याच्या या वातावरणात पोलीस कर्मचारी,तहसीलदार कार्यालय, आणि आरोग्य यंत्रणा आपल्या जीवावर उदार होवून काम करीत असल्याने, जनतेतून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.