मलकापूर येथील जय हनुमान मंदिर इथं आमदार कोरे निधीतून बोअर : भाविकांत समाधान
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील लांडोबा परिसरात जय हनुमान मंदिर परिसरात आमदार डॉ. विनयराव कोरे यांच्या निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी बोअर मारण्यात आली आहे. आणि ह्या बोअर ला पाणी सुद्धा लागले आहे.

येथील लांडोबा परिसरातील जय हनुमान मंदिर , हे येथील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दोन वर्षापूर्वी इथं विजेची सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु इथं पाण्याचे मात्र दुर्भिक्ष्य आहे. यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले आहेत. पाणी नसल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

दरम्यान येथील माजी आरोग्य सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर, नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, यांच्या पाठपुराव्याने आमदार कोरे यांच्या फंडातून बोअर मारली. या बोअर ला दीड इंची पाणी लागल्याने ज्यांनी प्रयत्न केले आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे भाविकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे परिसरात वृक्ष लागवड करता येईल. त्यामुळे येथील वातावरण प्रसन्न राहील.

यावेळी पाणी दाखवणारे पानाडी, तसेच बोअरवेल कामगार व या कामात सहकार्य करणारे ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे जय हनुमान मंदिर लांडोबा भक्त मंडळांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

या कामासाठी संदीप विभूते, महेश खटावकर, रोहन मिरजकर, रोहन भोगटे, निलेश गायकवाड, वरुण गांधी, विनायक हिरवे सर, रमेश भोगटे, भैय्या भोगटे, केदार कामेरकर, यांच्यासह सर्व भक्तांनी यासाठी सहकार्य केले.