” महाराष्ट्र बंद ” साठी रस्त्यावर उतरणार – श्री योगीराजसिंह गायकवाड
बांबवडे : उत्तरप्रदेश येथील लखीमपुर मध्ये शेतकऱ्यांच्या करण्यात आलेल्या हिंसाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास आघाडीने दि.११ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. या बंद च्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे युवा नेते योगीराजसिंह गायकवाड यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, देशात एके काळी ” जय जवान, जय किसान ” हा नारा असायचा. परंतु सध्या भाजप च्या काळात स्वातंत्र्यापूर्वीच्या या घोषणेला अगदी शून्य किंमत देण्यात येत आहे. सुमारे ११ महिने सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या या संघर्षाला अद्याप केंद्र शासन उत्तर देत नाही. याचा अर्थ केंद्रासाठी शेतकऱ्यांना किंमत च नाही. हेच एकंदरीत या एकूण घटनेवरून दिसत आहे. म्हणूनच महाविकास आघाडीने ” महाराष्ट्र बंद ” ची हाक योग्यच असून, आम्ही सर्व कार्यकर्ते या बंद साठी रस्त्यावर उतरणार आहोत, असेही योगीराजसिंह गायकवाड यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.