congratulationseducationalसामाजिक

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ च्यावतीने पुरस्कार विजेत्यांचा सन्मान संपन्न


कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ,शाखा कोल्हापूर महामंडळ सभा दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी कोल्हापूर इथं संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष श्री. राजाराम वरुटे उपस्थित होते.


या सभेमध्ये ५ सप्टेंबर २०२० व २०२१ या वर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व जे.पी. नाईक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये शाहुवाडी तालुक्याचे शिक्षक व आमचे मित्र श्री संभाजी लोहार सर यांचा देखील सन्मान करण्यात आला. या सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने हार्दिक अभिनंदन.


यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना, श्री वरुटे म्हणाले कि, शिक्षकांचा पगार १ तारखेलाच झाला पाहिजे. जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. बदल्या झाल्याच पाहिजे. बी.एल. ऑर्डर रद्द झालीच पाहिजे. या व इतर सर्वच प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी शिक्षक संघ सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे. असेही श्री वरुटे यांनी सांगितले.


यावेळी सौ.रसिका पाटील, श्री अमर पाटील, श्री सुतार सर, श्री बाजीराव कांबळे, श्री शिवाजी पाटील, श्री दिलीप बच्चे, श्री संभाजी बापट, श्री वसंत जाधव, तसेच सर्व तालुकाध्यक्ष यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.


या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ रसिका पाटील , अध्यक्ष शिक्षण सभापती जि.प. कोल्हापूर हे उपस्थित होते.
तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सल्लागार दा. शं. सुतार, शिवाजी दादा पाटील, पी.के. पाटील, वसंत जोशीलकर, रवींद्र नागटिळे, शिक्षक बँकेचे चेअरमन आण्णासो शिरगावे, व्हा. चेअरमन बाजीराव कांबळे, अध्यक्ष संभाजी बापट, कार्याध्यक्ष वसंतराव जाधव, सरचिटणीस उत्तम सुतार, कोषाध्यक्ष मारुती गुरव, कार्यकारिणी जिल्हा संघ,व संचालक मंडळ, सर्व तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी सर्व पतसंस्थेचे चेअरमन , सर्व शिक्षक पदाधिकारी, सर्व सदस्य, सर्व शिक्षक संघ प्रेमी उपस्थित होते. सर्वांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली, यासाठी शिक्षक संघाकडून सगळ्यांचे आभार मानण्यात आले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!