महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील यशाबद्दल कु. पूजा शेळके यांचे अभिनंदन – फ्रेंड्स मोबाईल अँड इलेक्ट्रोनिक्स शॉपी
बांबवडे :डोणोली तालुका शाहुवाडी येथील कु.पूजा आनंदराव शेळके , यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ३० रँक मिळवून उत्तीर्ण झालेबद्दल बांबवडे येथील फ्रेंड्स मोबाईल अँड इलेक्ट्रोनिक्स शॉपी च्या वतीने अमोल लाटकर व संदीप शेळके यांनी पूजा शेळके यांचे पुष्पहार व शाल देवून अभिनंदन केले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने देखील पूजा शेळके यांचे मनस्वी अभिनंदन.

पूजा शेळके यांनी मिळवलेल्या यशाबद्दल डोणोली ग्रामस्थ व आप्तेष्टांनी त्यांची बांबवडे ते डोणोली ओपन जीप मधून मिरवणूक काढली. यावेळी अनेकांनी कु.पूजा यांचे अभिनंदन केले. कु. पूजा शेळके या आनंदराव शेळके या प्राथमिक शिक्षकांची कन्या आहेत. सर्वसामान्य वर्गातून वाढलेल्या या मुलीने हे उत्तुंग यश मिळवल्याबद्दल समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.

बांबवडे ते डोणोली भैरवनाथ मंदिर पर्यंत काढलेल्या या मिरवणुकीत सामान्य जनता सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होती.