राजकीयसामाजिक

महाविकास आघाडी च्या ” महाराष्ट्र बंद ” ला शाहुवाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस चा जाहीर पाठींबा – श्री मानसिंगराव गायकवाड


बांबवडे : उत्तरप्रदेश मध्ये लखीमपुर येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याने ९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी च्यावतीने दि.११ नोव्हेंबर रोजी ” महाराष्ट्र बंद ” पुकारला आहे. या साठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शाहुवाडी तालुका च्यावतीने या ‘ महाराष्ट्र बंद ‘ ला आमचा जाहीर पाठींबा असल्याचे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष श्री मानसिंगराव गायकवाड दादा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.


गेले ११ महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असूनही केंद्र शासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. आणि यानंतर एका मंत्री महोदयांच्या चिरंजीवांनी हे दुष्कृत्य केले असून, अशा घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत ,असेही श्री. मानसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!