महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन मेळावा संपन्न
शाहुवाडी : सावित्रीबाई फुले जयंती चे औचित्य साधून शाहुवाडी तालुक्यातील पुसाळे गावातील महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला.

या मेळाव्यात महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाहुवाडी तालुका महिला संरक्षण अधिकारी योगेश नलवडे, शाहुवाडी पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशक विजयसिंह पाटील, महाराष्ट्र जिवन उन्नती अभियान मधील स्वप्नील सर व पुसाळे गावातील मान्यवर , तसेच गावच्या सरपंच कांबळे मॅडम, व ग्रामीण महिला वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.


सदरचा कार्यक्रम महिला बालविकास विभाग, महाराष्ट्र जिवन उन्नती अभियान व आनंदीबाई महिला संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता.