माऊली फुटवेअर चे विठ्ठल पोवार व नामदेव पोवार यांच्यावतीने अभिनंदन व शुभेच्छा

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील साळशी गावातील आशिष अशोकराव पाटील यांनी युपीएससी म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होवून, गावचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल साळशी ग्रामस्थांच्या वतीने त्यांची ओपन जीप मधून विजयी मिरवणूक काढली. यावेळी बांबवडे व मलकापूर येथील माऊली फुटवेअर चे मालक विठ्ठल पोवार व नामदेव पोवार यांनी त्यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले, तर पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.


ग्रामस्थांच्या वतीने आज दि.७ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता आशिष पाटील यांचा नागरी सत्कार करण्याचा कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.