माऊली फुटवेअर नवीन जागेत स्थलांतरित : भव्य उद्घाटन सोहळा संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील माऊली फुटवेअर चे स्व जागेत स्थलांतरित होत आहे. कै.शामराव शेळके संकुलात त्यांनी स्वमालकीची जागा घेतली असून, आज विजयादशमी च्या मुहूर्तावर ते स्वमालकी च्या जागेत स्थानापन्न झाले आहेत.

आज विजयादशमी च्या मुहूर्तावर वेदांताचार्य ह.भ.प.श्री कृष्णानंद शास्त्रीजी यांच्या शुभहस्ते या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. पूर्वी घोडे-पाटील कॉम्प्लेक्स मध्ये हे दुकान सुरु होते. यानंतर परिश्रमाने मलकापूर येथे नवीन शाखा काढण्यात आली. यामध्ये पोवार बंधूंचे कष्ट आणि त्यांच्या गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे.

यावेळी श्री शंकरराव ज्ञानदेव पोवार, श्री विष्णू ज्ञानदेव पोवार, श्री. सुनील शंकरराव पोवार,श्री. विठ्ठल विष्णू पोवार, श्री नामदेव विष्णू पोवार,आणि साळशीकर पोवार बंधू यांच्यासहित अनेक व्यापारी उपस्थित होते.

कै.शामराव शेळके व्यापारी कॉम्प्लेक्स ,अंबीरा पुलाशेजारी, माऊली फुटवेअर सुरु होत आहे. त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने दसऱ्याच्या तसेच नवीन जागेत स्थलांतरित झालेबद्दल अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.