राजकीयसामाजिक

माजी आमदार सत्यजित आबा यांना आमदार करणार – श्री मानसिंगराव गायकवाड दादा

बांबवडे : आम्ही कुठेही असलो तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार सत्यजित आबा यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते मानसिंगराव गायकवाड यांनी व्यक्त केले.


रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती च्या वतीने वि. का. स. सेवा संस्थाना संगणक वाटप कार्यक्रम ठमकेवाडी येथील राधेश्याम मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमात एकूण सत्तर वि.का.स. सेवा संस्थांना संगणक वाटप जाहीर करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री मानसिंगराव गायकवाड दादा होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर उपस्थित होते. यावेळी प्राथमिक स्वरुपात संजयसिंह गायकवाड वि.का.स. सेवा संस्था खुटाळवाडी, अरुण वि.का.स. सेवा संस्था वाडीचरण, पांडुरंग वि.का.स. सेवा संस्था चरण यांना संगणक मान्यवरांच्या हस्ते वाटप केले. उर्वरित संस्थांना त्यांच्या संस्थेत संगणक पोहोच करण्यात येतील. असेही संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.


अध्याक्स्थानावरून बोलताना मानसिंगराव गायकवाड पुढे म्हणाले कि, ज्यावेळी आम्ही कोल्हापूर जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होतो, त्यावेळी शेतकऱ्यांना सहकार्य करताना कधी राजकारण केले नाही. केवळ शेतकऱ्यांना सहकार्यच केले. रणवीरसिंग यांचे सेवा संस्थांशी असलेलं नातं पाहता भविष्यात पुढील १५ वर्षे रणवीर चं संचालक म्हणून निवडून येतील याची खात्री देतो. असेही श्री मानसिंगराव गायकवाड दादा यांनी यावेळी सांगितले.


यावेळी बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले कि, रणवीर सरकार कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून शेतकऱ्यांना मदत करा. कधी विरोधासाठी विरोध करू नका. सद्यस्थितीत तालुक्यात उद्योगधंदे येणे हि अशक्य गोष्ट आहे. तेंव्हा शेती हाच मुख्य व्यवसाय समजून काम करावे. कारण नोकऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. रणवीरसिंग यांनी शाहुवाडी तालुका कर्ज वाटपात अग्रेसर केला आहे. त्याचप्रमाणे वसुलीचे प्रमाण देखील चांगले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन. शेतकऱ्याला केंद्रबिंदू बिंदू मानून राजकारण विरहित काम करीत राहावे, याच त्यांना सदिच्छा.


यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एम. शिंदे यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती उपस्थितांना दिली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय साखर चे संचालक पंडित शेळके यांनी केले. यावेळी शाहुवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग पाटील, जालिंदर पाटील रेठरेकर, सुरेश पारळे, माजी शिक्षण सभापती महादेवराव पाटील,उदय साखर चे संचालक अजित पाटील, राजाराम चव्हाण, अक्षय पाटील चरणकर, उदय साखर चे व्हा. चेअरमन पृथ्वीराज खानविलकर, बांबवडे गावाचे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले तसेच वि.का. स. सेवा संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नंदकुमार जामदार यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!