माजी मंत्री हंडोरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवा,अन्यथा आंदोलन- आनंदराव कामत
बांबवडे : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सदरबाबत त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी. तसेच धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीमशक्ती संघटनेच्यावतीने निवेदनद्वारे अध्यक्ष आनंदराव कामत यांच्याकडून शाहुवाडी पोलीस ठाण्यात केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली. अशा मंडळींवर कठोर कारवाई व्हावी. त्याचबरोबर हंडोरे साहेब यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्त यांना देण्यात आले. हे निवेदन शाहुवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आलं.


भीमशक्ती संघटनेचे शाहुवाडी तालुका अध्यक्ष आनंदराव कामत यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे कि, हंडोरे साहेब हे भीमशक्ती संघटनेचे संस्थापक आहेत. जर सदर घटनेबाबत कारवाई झाली नाही, तर राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल.असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.