माजी सभापती बाळकृष्ण इंदुलकर यांचे निधन
बांबवडे : शाहुवाडी तालुक्याचे माजी सभापती बाळकृष्ण नामदेव इंदुलकर (मामा) यांचे काल दि.१० एप्रिल २०२२ रोजी विरळे तालुका शाहुवाडी इथं अल्पश : आजाराने निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

स्व. बाळकृष्ण इंदुलकर मामा हे माजी आमदार बाबासाहेब पाटील शिक्षण संस्था सरूड तालुका शाहुवाडी, या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते. तसेच माजी सभापती लतादेवी जालिंदर पाटील यांचे ते वडील, तर माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर पाटील यांचे ते सासरे होते.