मानसिंगराव गायकवाड व सत्यजित पाटील यांचे बांबवडे मतदारसंघातील उमेदवार जाहीर
बांबवडे :शाहुवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघापैकी बांबवडे जिल्हा परिषद व पंचायत समिती चे मानसिंगराव गायकवाड दादा व सत्यजित पाटील आबा गटाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. 
बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सौ राजकुवर रणवीरसिंग गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच बांबवडे पंचायत समिती गण साठी अभयसिंह बाळासाहेब चौगुले यांची तर पिशवी पंचायत समिती गण साठी श्री बाबुराव पाटील यांच्या पत्नी सौ लक्ष्मी बाबुराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यावेळी बोलताना श्री मानसिंगराव गायकवाड दादा म्हणाले कि, यावेळी नवे चेहरे आपण समोर आणत आहोत. यांचे भवितव्य आपण सर्व कार्यकर्ते मिळून घडवाल, याची खात्री आहे.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील आबा म्हणाले कि, आपण सगळ्यांनी मिळून एकसंघपणे प्रयत्न करूया. यावेळी आपल्या युतीचे सर्व उमेदवार निवडून आणूया.
दरम्यान जे उमेदवार जाहीर करण्यात आले, त्यांच्याविरोधात अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अद्याप निवडणूक विषयी काही सांगता येत नाही. या मतदारसंघात जनसुराज्य पक्षाच्या वतीने उमेदवारीचा निकाल जाहीर केलेला नसून, यामुळे मतदारसंघातील सस्पेन्स वाढत आहे.
यावेळी केडीसिसी चे संचालक रणवीरसिंग गायकवाड,
शेकाप चे भाई भरत पाटील, वसंत पाटील, बांबवडे चे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


