मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीराम मंगल कार्यालयाचे उद्घाटन
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील श्रीराम मंगल कार्यालय चे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे.
डोणोली येथील वरद डायगनोसीज सेंटर च्या समोर श्री राम मंगल कार्यालय साकारले आहे. सर्व सोयींनी युक्त हे मंगल कार्यालय आहे. इथ भव्य डायनिंग, प्रशस्त पार्किंग, योग्य व्यासपीठ सारख्या सर्व सुविधा इथ उपलब्ध आहे.
अशा मंगल कार्यालयाचे उद्घाटन श्री समीर शिंगटे प्रांताधिकारी शाहुवाडी – पन्हाळा, श्री गणेश लव्हे तहसीलदार शाहुवाडी, श्री विजय घेरडे पोलीस निरीक्षक, श्री आप्पासो पवार पोलीस उपाधीक्षक, श्री मंगेश कुन्चेवार गटविकास अधिकारी शाहुवाडी पंचायत समिती, श्री प्रवीण कुंभारे उप कार्यकारी अभियंता शाहुवाडी वीज वितरण कंपनी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे.


