माहिती अधिकाराला केराची टोपली ? शाहुवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील एका ग्रामपंचायती ने माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती अद्याप दिलेली नाही. असं नेमकं काय आहे ते माहितीमध्ये कि, जि माहिती ग्रामपंचायत देण्यास दिरंगाई करीत आहे. असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. यासाठी अपिलीय अधिकाऱ्यांकडून सुद्धा माहिती मागण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे अर्जदार शैलेश चोरगे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

शैलेश चोरगे यांनी हारुगडेवाडी ग्रामपंचायत कडे माहिती च्या अधिकाराखाली ०१-०४-२०१८ ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान चौदाव्या वित्त आयोगातून केलेल्या कामांची माहिती मागीतली होती. परंतु गेल्या पाच महिन्यांपासून ह्या माहितीची मागणी करून सुद्धा ग्रामपंचायत ने हि माहिती दिलेली नाही. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी या माहितीची मागणी केली होती. परंतु ती माहिती अद्याप दिलेली नाही.याबाबत पंचायत समिती कडे सुद्धा तक्रार केली होती. पण त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुद्धा कानाडोळा करण्यात आला.

यामुळे लोकशाही चा अपमान होत असून, माहिती न पुरवणाऱ्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा शैलेश चोरगे यांनी केली आहे. या एकंदरीत प्रकरणावरून संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती च्या अधिकाराला केराची टोपली दाखवली का ? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.