मा. विनायक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनिटायझर चे वाटप
सरुड : सरुड गावचे युवा नेते व सामाजिक कार्याचा वारसा व सर्व सामान्यासाठी कार्यतत्पर असणारे व्यक्तिमत्त्व मा. श्री. विनायक विलासराव पाटील-भैय्या यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व गरीब व्यक्तींना मास्क वाटप व सनिटायझर वाटप करण्यात आले आहे. आताच्या काळात वाढदिवस साजरा करण्यापेक्षा कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांच्या हा उपक्रम स्तुत्य आहे, अशी परिसरात चर्चा आहे. असाच आदर्श इतरांनीही घ्यावा. यावेळी सुमारे 200 गरीब व गरजू लोकांना याचा लाभ मिळाला.
यावेळी त्यांचे सहकारी रणजीत, सुरज, रोहित, संग्रामसिंह , प्रसाद- B N भाऊ, अनिकेत, अशोक, दिग्विजय,निखिल, जयदीप, मनोज,सुजित ,प्रवीण यांसह अनेक मित्र परिवार उपस्थित होता.