मिडिया ईज पॉवर : पत्रकारिता समाजमनाचा आरसा
बांबवडे : ” पत्रकारिता ” म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ. तो प्रशिक्षित असावा, असं समाजभान आहे. कारण लोकशाहीमध्ये समाजाला केंद्रस्थान दिलं गेलं आहे. समाजाच्या जडणघडणीवर अनेक लोकप्रतिनिधी काम करीत असतात, प्रशासन राबत असते. ते किती बरोबर आहेत, किंवा कुठे चुका होत आहेत. हे दाखविण्याचं काम ” पत्रकार ” करीत असतो. म्हणूनच त्याला आपल्या लोकशाही मध्ये ‘ मानाचे स्थान ‘ दिले गेले आहे. पत्रकाराला अनेक नियमांचं ज्ञान असावं, असं गृहीत धरलं जात असतं. यासाठीच पत्रकाराला शिक्षित करण्याचा काम प्राथमिक स्तरावर आम्ही करण्याचं योजिले आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने पत्रकारिता करावयाची असेल, तर प्राथमिक ज्ञान आम्ही आमच्या ” एसपीएस न्यूज ” वेब पोर्टल च्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत. गेल्या २५ वर्षांच्या अनुभवासाहित आपल्यासमोर आम्ही येत आहोत. जर आपण इच्छुक असाल, तर निश्चित आमच्याशी संपर्क साधा.


याचा कालावधी तीन महिन्यांचा असेल. प्रत्येक रविवारी सकाळी १०.०० ते १.०० वाजेपर्यंत आपले क्लासेस चालतील. यासाठी शिक्षण मूल्य केवळ तीन हजार रुपये आकारले जाणार आहेत. यापैकी सुरुवातीला किमान १५००/- रु. भरणे , गरजेचे आहे. या काळात आपल्याला ” एसपीएस न्यूज ” चे प्रेस कार्ड प्रशिक्षणार्थी म्हणून दिले जाईल. जर भविष्यात आपल्याला अनुभव येण्यासाठी काम करायचे असेल, तर तिथून पुढे एक वर्ष आपल्याला बातमीदार म्हणून नेमणूक केली जाईल. याचे एक वर्षाचे अनुभवाचे प्रमाणपत्र आपल्याला दिले जाईल.

मग येताय पत्रकारिता शिकायला ? , तर खालील क्रमांकावर साधा.: ९९२२९६५६००. जागा मर्यादित आहेत. नव्या वर्षाच्या नव्या संधीला स्वीकारा.