sahakarराजकीयसामाजिक

मुंबई येथे फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दुध संघाचे नविन शाखेचे उद्घाटन

शिराळा / प्रतिनिधी :
शिराळा तालुक्यातील फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दुध उत्पादक संघ लि. शिराळा यांचे मुंबई येथिल नविन १लाख लि क्षमतेच्या अदघावत शाखेचे उद्घाटन माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सां.जि. म. सह. बँक व विराज व विश्वास उदयोग समुहाचे अध्यक्ष मा आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) हे होते.प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत चेअरमन अमरसिंग नाईक यांनी केले.


यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले की, अल्पावधीत फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सह. दुध संघाने मोठी प्रगती केली आहे. स्वतःच्या जागेत अदयावत दुग्ध शाखेची उभारणी केली. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. संस्थेने प्रचिती या बॅन्ड ने कायमच गुणवत्तापुर्ण व निर्भेळ अशा दुध व दुग्धपदार्थाचा पुरवठा केला आहे. मुंबई येथे पॅकिंग म्हैस, गाय दुध दुग्धजन्य पदार्थ श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खवा, तुप, पनिर, पेढे, दही, ताक, रब्बडी, इ. दर्जेदार दुग्ध पदार्थ मुंबईकरांसाठी वितरण चालु होईल.


आ. नाईक म्हणाले की फत्तेसिंगराव नाईक (आण्णा) यह दूध उत्पादक संघाची दर्जेदार उत्पादने प्रचिती बॅन्ड नावाने मुंबईकरांसाठी उपलब्ध होतील. आपले भागातील लोकानी आपल्या घरच्या दुध व दुग्धपदाथीचा लाभ घ्यावा. संघाचे चेअरमन अमरसिंह नाईक म्हणाले की, मुंबई येथिल अदयावत दुग्ध शाळेमुळे संघाचे उत्पन्नात भर पडुन दुध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल. या कार्यक्रमास साजि मध्यवर्ती बँकेचे संचालक मा. रणधीर नाईक व युवा नेते भुषण नाईक (आण्णा) उपस्थित होते. या कार्यक्रमात संघाचे व्हा. चेअरमन प्रकाश रावजी धस, राजाराम बापु संघाचे संचालक पोपट जगताप, बाळासाहेब पाटील, प्रचिती दुध संघाचे संचालक अनिल पाटील, संजय पाटील माणिक दशवंत, सौ. रूपाली पाटील, सौ. मंगल पाटील, श्रीरंग भोसले, प्रदिप यादव, प्रणव पाटील, शरद पाटील, शिवाजी यमगर, नामदेव पडवळ, गणेश पाटील, शिवाजी लाड, मानसिंग पाटील, सुरेश चिंचोलकर, संजयकुमार शिंदे, लक्ष्मण पाटील तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते. वाहतुकदार अनिल चिवटे व मुंबई येथील दुध व्यवसायीक प्रमुख्याने उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!