मुलांच्या बुध्दीचा विकास साधण्यासाठी विज्ञान प्रदर्शन उपयुक्त – विश्वास सुतार
शिराळा प्रतिनिधी
बालवयातच प्रज्ञावंत मुलांच्या बुध्दीचा विकास करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनं उपयुक्त ठरतात, वैज्ञानिक प्रगती साधण्यासाठी विज्ञानांची कास धरा, अंधश्रध्दा दूर करा, असे मत गटशिक्षणाधिकारी विश्वास सुतार यांनी व्यक्त केले.
ते तुरूकवाडी ता. शाहूवाडी येथील दत्तसेवा माध्य. विद्यालयात ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच संजय माईगडे होते. प्रारंभी कुंडीतील रोपास मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून उध्दघाटन करण्यात आले. प्रदर्शन कक्षाचे अनावरण फित कापून सहा.गटविकास अधिकारी हेरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञान सचीव बाबूराव शिंदे यांनी प्राथमिक विभाग इ.६ वी ते ८ वी- ६३, माध्यमिक ६ वी ते ८वी.३५, इ.९ वी ते १२वी.५४, प्राथमिक शिक्षक-३ माध्यमिक शिक्षक-७ व प्रयोगशाला सहा. परिचर -४.आशा १६६ साधनाची नोंद झाल्याचे सांगितले.
यावेळी कार्याध्यक्ष गणेश पाटील, माध्यमिक पत.संस्थेचे व्हा.चेअरमन प्रकाश कोकाटे, बाबूराव शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी संस्थेचे सचीव डॉ. बाळासाहेब पाटील, प्रशासनाधिकारी जे.एस.पोतदार, तंटामुक्त आध्यक्ष तानाजी पाटील, शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे-पाटील, सदाशिव थोरात,कृष्णात कडू , बी बी कोंडावळे, शिवराम मावची ,शिवाजी माळी, सदाशिव कांबळे, साहेब शेख, प्राथमिक व माध्यमिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रदर्शनासाठी बाबूराव शिंदे, क्रांती माजले, दत्तसेवाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेत आहेत. सुत्र संचालन संभाजी लोहार यांनी केले. आभार शिक्षण विस्ताराधिकारी आनंदराव सुतार यांनी मानले.