“ मुस्लीम जमियत ” च्यावतीने ‘ कोविड सेंटर ’ ला मदत
शाहुवाडी प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील मुस्लीम जमियत संघटनेच्यावतीने रमजान ईद निमित्त कोरोना प्रतिबंध उपाय योजनेसाठी, औषध फवारणीसाठी आवश्यक फवारणी पंप, तहसीलदार गुरु बिराजदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे उपस्थित होते.
शाहुवाडी तालुक्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तालुक्यात दोन ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहेत. याठिकाणी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रणा त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक साहित्य अनेक माध्यमातून मदत रूपाने दिले जात आहेत. याच हेतूने मलकापूर येथील मुस्लीम जमियत संघटनेच्यावतीने ईद च्या खर्चाला फाटा देवून कोविड सेंटर याठिकाणी सुरक्षेसाठी फवारणी करणेसाठी स्प्रे पंप तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी मुस्लीम जमियत संघटनेचे अध्यक्ष बाळू जमादार, व मुस्लीम बांधव उपस्थित होते.