म्हसाई पठारावरून कार दरीत कोसळली : 2 ठार 1 जखमी
वारणानगर प्रतिनिधी(सनी काळे) : पन्हाळा तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या म्हसाई पठारावरून एक चार चाकी वाहन घसरून, सुमारे तीनशे फुट दरीत कोसळले आहे. या दुर्घटनेत 2 ठार झाले असून अन्य एक गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक माहिती नुसार समजते आहे. हि घटना आज दि. ६ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडल्याचे समजते.

कोडोली पोलीस ठाणे व विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चार चाकी वाहनातून (क्र. MH 12 JM 3956) इचलकरंजी हून तिघे जण आले होते. यापैकी निखील युवराज शिंगे कबनूर ग्रामपंचायत मध्ये क्लार्क म्हणून नोकरीस होते. तर अमित गुप्ता, पुष्पक लिंगाडे दोन्हीही राहणार इचलकरंजी असे तिघेजण होते. दरम्यान यापैकी कोण ठार झाले याची अद्याप प्रत्यक्ष माहिती उपलब्ध झालेली नाही.