यशराज ऑप्टीकल्स च्यावतीने मुकुंद पवार यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार संपन्न
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील यशराज ऑप्टीकल्स च्यावतीने आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार विजेते मुकुंद पवार यांचा सन्मान चिन्ह शाल, व बुके देवून सन्मान केला.

मुकुंद पवार हे सुमारे २५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी केलेल्या प्रामाणिक कार्याबद्दल त्यांना मिळालेला पुरस्कार निश्चितच प्रशासनीय आहे, असे मत यशराज ऑप्टीकल्स चे मालक ओंकार व मयूर कदमबांडे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले.

यावेळी मुकुंद पवार यांनी दोन्ही भावांनी गेली १५ वर्षे चष्म्याच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले, तसेच त्यांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.