” यशराज ऑप्टीकल्स ” च्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं असलेल्या ” यशराज ऑप्टीकल्स ” या चष्म्याच्या दुकानाचा गुढी पाडव्यादिवशी १४ वा वर्धापनदिन संपन्न होत आहे. हा दिवस ओंकार आणि मयूर कदमबांडे या बंधुंसाठी खूप यशस्वी दिवस असणार आहे.

या १४ वर्षात या कदमबांडे बंधूंनी आपल्या कष्टाने लोकांशी निर्माण केलेल्या नात्याने आपला व्यवसाय यशस्वी केला आहे. प्रगतीची एक एक पावले टाकत त्यांनी आजपर्यंत ची मजल मारली आहे. आपल्या व्यवसायासाठी लागणारे तंत्रज्ञान शिकून, त्यामध्ये प्राविण्य मिळविले.

म्हणूनच आज ग्राहकवर्ग यशराज ऑप्टीकल्स साठी आग्रह धरत आहे. इथं मिळणाऱ्या चष्म्याच्या फ्रेम्स फॅन्सी, रेग्युलर, तसेच प्रत्येक व्यक्तिमत्वाला शोभेल , अशा असतात. इथं विद्यार्थी येतात, तर व्यावसायिक सुद्धा यांच्यासाठी आपली पसंती व्यक्त करतात. याचबरोबर वृद्ध मंडळीसुद्धा आपली पसंती ” यशराज ऑप्टीकल्स ” लाच देतात.

पुनश्च ” यशराज ऑप्टीकल्स ” च्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने कदमबांडे बंधूंचे अभिष्टचिंतन. आणि लाख लाख शुभेच्छा