यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली चे शैक्षणिक वर्ष १ जून पासून सुरु
बांबवडे प्रतिनिधी : यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली तालुका शाहुवाडी ,हि शाळा १ जून पासून सुरु झाली असून, इथं शाळेच्या प्राचार्य व शिक्षकवृंदा कडून लाडू वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळ व उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी शाळेचे अकॅडमीक प्रमुख स्नेहा भंडारे मॅडम , सांस्कृतिक समिती प्रमुख संग्राम सुतार, व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंददायी नियोजन केले. यावेळी सचिव डॉ. जयंत पाटील यांनी संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व नवोदित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे स्वागत केले. असे संस्थेचे प्राचार्य सचिन जद सर यांनी सांगितले.

यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली हि पंचक्रोशीतील एक नामांकित शाळा असून, उच्च दर्जाचे शिक्षण इथं दिले जाते. म्हणूनच शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

येथील शिक्षकवृंद उच्च विद्याविभूषित असून, या शाळेमध्ये विद्यर्थ्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांचा देखील समावेश असतो. या शाळेची गुणवत्ता म्हणजे येथील ८५ % विद्यार्थी ८५ % च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण होतात. तर शाळेचा १० वी चा निकाल १०० % लागतो. हा या शाळेचा विश्वास आहे.

यावेळी बोलताना प्राचार्य श्री सचिन जद सर म्हणाले कि, आपला भाग दुर्गम आहे. इथं खऱ्या अर्थाने उच्च शिक्षण देणे, हि काळाची गरज आहे. तरच या ग्रामीण भागाची पुढची पिढी उच्च विद्याविभूषित होवून, आपल्या भागाचा उत्कर्ष करेल. असेही श्री जद सर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन रुपाली केमाडे मॅडम व सौ. विद्या पाटील मॅडम यांनी केले.