यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली चा ७ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
बांबवडे : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली संचलित, यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली चा ७ वा वर्धापन दिन संपन्न झाला. यानिमित्त शाळेत सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते.

२०२२-२३ या सालामध्ये सत्यनारायण पूजेचा मान शैक्षणिक वर्षामधील पहिला प्रवेश घेणाऱ्या पालकांना मिळतो. या वर्षी तो मान सौ.व श्री प्रदीप शंकर विभूते यांना मिळाला असून, पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी शाळेच्या तसेच संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा लाभ शाळेच्या सर्व पालकांना तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थांना मिळाला. सत्यनारायण पूजेचे भक्तिमय कथा पठण श्री प्रवीण बुरांडे ( काका ) यांनी केले.

संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा प्रदीप पाटील , संस्थेचे सचिव मान्यवर डॉ. जयंत प्रदीप पाटील, व विश्वस्त सौ विनिता जयंत पाटील व इतर संस्था प्रतिनिधी यांनी या वर्धापन दिनानिमित्त शाळेस भेट दिली. यावेळी त्यांनी तिर्थप्रसादाचा लाभ घेवून, संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचा दर्जा असाच निरंतर टिकवून किंबहुना त्यामध्ये अधिकाधिक सोयी सुविधा पुरवून, शैक्षणिक क्षेत्रात यशवंत शाळेची शैक्षणिक प्रगती करण्याची ग्वाही शाळेचे प्राचार्य श्री सचिन प्रकाश जद सर यांनी दिली.