यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली च्या विद्यार्थ्यांची एसएससी परीक्षेत बाजी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली च्या विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत बाजी मारली असून, शाळेचा निकाल १०० % लागला आहे. दरम्यान या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांच्या शाळेत न घेता बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय या परीक्षा केंद्रावर घेतल्या गेल्या आहेत. शाळेतील सर्व विद्यार्थी ७७ % च्या पुढे गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. याबाबत परिसरातून विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन. यावेळी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शाळेचा शिक्षकवृंद, व पालक वर्ग या सगळ्यांकडून विद्यार्थ्याचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी डोणोली इथं १० वी ला शिकवणारे शिक्षकवृंद १० वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेला आहे. इथं १० वी साठी इंग्रजी शिकवण्यासाठी प्राचार्य सचिन जद सर, सौ. स्नेह भंडारे, सौ. रुपाली केमाडे -मराठी, सौ मेघा हेरलेकर – हिंदी, सौ.सीमा थोरात – समाजशास्त्र, सौ. मेघा पाटील – गणित व भूमिती, सौ. आरती कांबळे – विज्ञान, श्री सुशांत बुगले – संरक्षण शस्त्र व जलशास्त्र आदी शिक्षकवृंद यांनी शाळेच्या दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या या यशासाठी स्वत: विद्यार्थी , पालक यांच्यासह त्यांचे शिक्षक यांनासुद्धा त्याचे श्रेय जाते.