येलूर इथं (NSS ) च्या शिबिराचे उद्घाटन संपन्न
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र व प्रा. एन.डी. पाटील महाविद्यालय पेरीड यांच्या संयुत विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना (NSS ) ,शिबिराचे उद्घाटन येलूर तालुका शाहुवाडी इथं संपन्न झाले.

या शिबिराचे आयोजन दिनांक २४ मार्च ते ३० मार्च दरम्यान करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य / केंद्रप्रमुख प्रा. सुनील हेळकर सर, गटविकास अधिकारी श्री अनिलकुमार वाघमारे ,केंद्र संयोजक डॉ. नामदेव आडनाईक सर, येलूर गावाच्या सरपंच सौ कमल तुकाराम पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिकेत हिरवे, केंद्र सहाय्यक श्री सुरेश तडावळेकर, समंत्रक डॉ. युनुस शेख, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.