येलूर पैकी शेळकेवाडी इथं जमिनीच्या वादातून हाणामारीत वृद्ध व महिला जखमी
मलकापूर प्रतिनिधी : येलूर पैकी शेळकेवाडी इथं जमिनीच्या वादातून वृद्ध आणि महिला जखमी झाली आहे. सदर घटनेची फिर्याद शाहुवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.


येलूर पैकी शेळकेवाडी इथं चुलते-पुतणे यांच्या जमिनीच्या वाटणी वरून वाद झाला असून त्याचे पर्यावसन दगडाने हाणामारीत झाले. यामध्ये सखाराम धोंडीबा शेळके वय ७२ वर्षे यांना दगड लागल्याने ते जखमी झाले आहेत.


हि घटना दि.३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजनेच्या दरम्यान येलूर पैकी शेळकेवाडी इथं घडली. या हाणामारीत रेखा सखाराम शेळके, शारदा सखाराम शेळके या महिला देखील जखमी झाल्या आहेत. याबाबत अविनाश आकाराम शेळके यांच्यावर सखाराम धोंडीबा शेळके यांनी तक्रार दाखल केली आहे.