रणवीरसिंग गायकवाड युवाशक्तीचा ‘ माणुसकी चा हात ‘
बांबवडे : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शाहुवाडी तालुक्यात महापूर आला. या महापुरात वारणा नदीकाठी असलेल्या थेरगाव गावाला सुद्धा फटका बसला.या गावातील संदीप मारुती पाटील यांच्या घराची पडझड झाली. रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती च्या माध्यमातून त्यांना माणुसकी चा हात दिला. त्यांना दहा हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे संस्थापक रणवीरसिंग गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

शाहुवाडी तालुक्यात अनेक गावांमध्ये अतिवृष्टीने अनेक ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. त्यांचे नुकसान भरून न निघण्यासारखे आहे. अशावेळी तालुक्यातून समाजसेवी संस्थांनी पुढे येवून लोकांना सहकार्य करावे, असे आवाहन देखील श्री रणवीरसिंग गायकवाड यांनी केले आहे.

यावेळी रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती चे शाहुवाडी तालुकाध्यक्ष श्री समीर पाटील सावेकर, थेरगाव चे मा.उपसरपंच उदय पाटील, जयपाल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.