रमेश नाईक यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

रमेश नाईक हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असून, सामान्य नागरिकांची सेवा हाच ध्यास घेवून, त्यांची वाटचाल सुरु आहे. निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रशासकीय कामांचा अनुभव नसतो. त्यामुळे त्यांना शासकीय कार्यालयात अनेक अडचणी येतात. पण त्यांना मदत करण्याचा विडा मात्र रमेश नाईक यांनी उचलला आहे. निराधार मंडळींना पेन्शन मिळवून देणे. यासारख्या अनेक योजना या ज्येष्ठ मंडळींना ते मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.

तसेच अनाथ आश्रम ला भेट देवून तेथील विद्यार्थ्यांना आधार देण्याचा त्यांनी भावनिक प्रयत्न केला आहे. तसेच पोलीस ठाणे ला सहकार्य करण्यासाठी पोलीस बॉईज या ग्रुप मध्ये त्यांचा अग्रक्रम आहे. सामाजिक भावना जोपासण्यात त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. भविष्यात ते मलकापूर नगरपरिषद च्या माध्यमातून राजकारणात सुद्धा प्रवेश करू शकतात.

पुनश्च रमेश नाईक या तरुण व्यक्तिमत्वाला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.