राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचे, चित्ररथाच्या माध्यमातून दर्शन
मलकापूर प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी सोहळ्यानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात चित्र रथाचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्ररथ दि.१५ मे रोजी मलकापूर तालुका शाहुवाडी इथं पोहचला असून, नगरीतून चीत्र्राथाच्या दर्शनाचे आयोजन करण्यात आले .

मलकापूर इथं चित्ररथ पोहचला असून, या माध्यमातून नागरिकांना शाहू महाराज यांच्या कार्याचे दर्शन चित्ररथाच्या माध्यामातून जनतेला करवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या चित्ररथाच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वंदन करण्यात येत आहे. चित्ररथाच्या चार वेगवेगळ्या गाडीतून माहितीपटाचे बोर्ड प्रत्येक गाडीवर लावण्यात आले होते.

यापैकी पहिल्या गाडीवर महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना मंदिर प्रवेश खुला गेल्याचे चित्र होते. एका बाजूला अंबाबाई तर दुसऱ्या बाजूला जोतीबा राजा, याचबरोबर मशीद आणि चर्च यांची रचना करून, यातून सर्वधर्मसमभावाचे विचार मांडणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे दर्शन घडविण्यात आले.

दुसऱ्या गाडीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कोल्हापूर भेट , तसेच छत्रपती शाहू महाराजांचे इंग्लंड मुक्कामी असतानाचे १९०२ सालचे छायाचित्र होते.

तिसऱ्या गाडीवर समानतेचा विचार, समानतेची कृती, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर व दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषद, माणगाव परिषद यांचे चित्ररथावर दर्शन झाले.

चौथ्या गाडीवर शिक्षण रथ १९११ मध्ये खास हुकुम गॅझेट द्वारे, मागासलेल्या जातीतील शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या मुलींसाठी निवास व भोजन व्यवस्था मोफत दिली, तसेच हुशार मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या.
अशा चित्ररथांचे दर्शन घडविण्यात आले.