… राजे छत्रपती जाहले : छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा
बांबवडे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४८ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराजांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने मानाचा त्रिवार मुजरा.
६जुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन. याच दिवशी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज छत्रपती झाले. आणि अवघ्या महाराष्ट्राला छत्रपती लाभले. पण हा दिवस पाहण्यासाठी राजांना अनेक मौल्यवान हिरे इरेला घालावे लागले. म्हणजेच अनेकांच्या बलिदानातून हे स्वराज्य निर्माण झालं, याचा विसर कधी राजांना पडला नाही.
राजांनी बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांच्यासहित अनेक जाती धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची स्थापना केली. इथं जातीपातीला तिलांजली दिली गेली , आणि स्वराज्यनिर्मिती हा एकच ध्यास मनी जपला, आणि त्यामुळेच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने किमत आली.
अशा या महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांना पुनश्च शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा.