राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळेत “मनसे ” च्यावतीने फळे वाटप
मलकापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाहुवाडी येथील केंद्रीय अनुसूचित जाती अंतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रम शाळा शाहुवाडी येथील मुला मुलींना मनसे च्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले.


यावेळी कामगार सेना रायगड जिल्हा सह चिटणीस जयसिंग पाटील, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर, तसेच मान्यवर पदाधिकाऱ्यांनी मुलांशी संवाद साधला.
यावेळी शाहुवाडी तालुक्यातील तालुका सचिव रोहित जांभळे, परेश सातपुते, सचिन पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.