राधानगरी च्या सुनबाई, व शाहुवाडी च्या माहेरवाशीण सौ वंदना जाधव आरोग्य सभापती, यांचा चरण इथं सत्कार
बांबवडे( दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्यातील सुकन्या आणि राधानगरी च्या सुनबाई यांनी दोन्ही घराच्या , गावांच्या आणि तालुक्याच्या वेशीला खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी चे तोरण बांधले आहे. चरण सारख्या गावाने मुलींच्या नावे रोख रक्कम ठेव ठेवण्याची परंपरा सुरु केली, आणि अवघ्या राज्याने ती स्विकारली. इथं खऱ्या अर्थाने स्त्रीत्वाचा सन्मान झाला आहे. सौ वंदनाताई जाधव यांनी बांधकाम व आरोग्य सभापती पदाची धुरा उचलली असून ती, त्या सक्षमपणे पेलतील, यात शंका नाही. असे गौरवोद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले.

चरण तालुका शाहुवाडी इथं नूतन कोल्हापूर जिल्हा परिषद च्या बांधकाम व आरोग्य सभापती सौ वंदनाताई अरुण जाधव यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सौ.वंदनाताई जाधव यांचं माहेर चरण आहे. म्हणूनच आपल्या जन्मभूमीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या आल्या होत्या. यावेळी त्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने ‘ माहेरची साडी ‘ देवून करण्यात आला.

यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक डी.जी. लाड सर यांनी केले.

यावेळी मा. आम. सत्यजित पाटील म्हणाले कि, राधानगरी चे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सौ वंदनाताई यांना आरोग्य सभापती करून, अवघ्या स्त्रीत्वाचा सन्मान केला आहे. वंदनाताई आमच्या शाहुवाडी तालुक्याच्या असून आम्हाला पुनश्च सभापती पद मिळाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आणि आमच्या वंदनाताई मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं करतील, यात शंका नाही.

,,
यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन बांधकाम व आरोग्य सभापती म्हणाल्या कि, माझं सासर राधानगरी तालुक्यातील तळाशी जरी असलं, तरी चरण च्या माहेरवाशीणी चा केलेला हा सत्कार मी आयुष्यभर लक्षत ठेवीन, कारण माझ्या शाहुवाडी तालुक्यातील चरण हि माझी जन्मभूमी आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. सासर आणि माहेर या दोन्ही घरांसाठी तसेच तालुक्यांसाठी, तसेच माझ्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी जे जे शक्य आहे, ते ते शासनाच्या सहकार्याने करण्याचा मी यथोचित प्रयत्न करेन, याची ग्वाही देते. दरम्यान ज्या शाळेने मला ज्ञानाचे स्तनपान केले, त्या शाळेसाठी सहा लाख रुपये मी देत आहे. हि माझी छोटीशी भेट माझ्या शाळेसाठी आहे. जिल्ह्यामध्ये काम करण्याची मिळालेली संधी, हा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे.

यावेळी माजी सरपंच के.एन. लाड,, डी.जी. लाड, सुनील लाड, अनिल लाड,व ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांचा माहेर ची साडी देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी सभापती सौ वंदना जाधव यांचे वडील श्री एकनाथ लाड गुरुजी, श्री अरुण जाधव, जिल्हा परिषद चे माजी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, जि.प. सदस्य आकांक्षा पाटील, शाहुवाडी पंचायत समिती चे सभापती विजयराव खोत, अमर पाटील, जालिंदर पाटील, सुरेश पारळे, शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता पोवार, एल.वय.पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते.

सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले,तर आभार रमेश डोंगरे यांनी मानले.