रामचंद्र शेळके आप्पांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
बांबवडे : मैत्री काय असते, हे पाहण्यासाठी काही व्यक्तिमत्व आपोआप डोळ्यासमोर येतात. नेहमी अडलेल्या मंडळींना सहकार्य करणारे आमचे मित्र डोणोली तालुका शाहुवाडी येथील रामचंद्र शेळके आप्पा आणि डोणोलीकरांचे रामभाऊ यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

माणसाने नेहमी सत्कार्य करावे. एकमेकांना सहाय्य करणारे हे व्यक्तिमत्व ज्यांच्या, ज्यांच्या सहवासात आले त्यांना निश्चितच कळाले असेल. त्यांनी अगदी आठवणीने माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाचा वाढदिवस साजरा केला. हे आम्ही अद्याप विसरलेलो नाही. नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीला धावून येणारे हे व्यक्तिमत्व अविस्मरणीय आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस त्यांना काय देवू शकणार आहे. परंतु आपल्याला सहकार्य केलेली सर्वच मंडळी आमच्या स्मरणात राहतात.

म्हणूनच या जीवा-भावाच्या मित्राला मुकुंद पवार आणि परिवाराच्यावातीने तसेच सुरेश नारकर बापू आणि मित्रपरिवार यांच्यावतीने मन:पूर्वक शुभेच्छा.