राष्ट्रवादीचा दि.२१ एप्रिल रोजी परिवार संवाद मेळावा
बांबवडे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ची परिवार संवाद यात्रा शाहुवाडी तालुक्यात दि.२१ एप्रिल रोजी पोहोचणार असून, या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चा कार्यकर्ता मेळावा समर्थ कृपा मंगल कार्यालय बांबवडे तालुका शाहुवाडी इथं सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा मंत्री नाम. जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविणार असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, तसेच जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांची देखील उपस्थिती असणार आहे.

तसेच तालुक्यातील इतर राष्ट्रवादी चे नेते आणि पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान सदर च्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे पैलवान देखील या कार्यक्रमास उपस्थित असणार आहेत.