राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बांबवडे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री उत्तम मोरे यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा .

श्री उत्तम मोरे हे राजकीय पटलावर आलेलं नवं व्यक्तिमत्वं आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड (दादा ) यांच्या सहकार्याने, तसेच त्यांच्याकडे असलेला उत्साह पाहता, पक्षाने त्यांना हि नवी जबाबदारी सोपवली. या अनुषंगाने मोरे यांनी देखील आपल्याला मिळालेल्या पदाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य वर्गाला एकत्रित करण्याचे महत्वाचे कार्य श्री उत्तम मोरे यांनी केले आहे. याचबरोबर सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा त्यांचा मनसुबा आहे. त्यांची नियुक्ती झाली आणि, कोरोना चे थैमान सुरु झाले. यात त्यांनी आपली सामाजिक भूमिका निभावली. समाजात मास्क व सॅनिटायझर चे वाटप करून त्यांनी समाजाला कोरोना पासून दूर ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याचबरोबर ज्यावेळी ऑक्सिजन चा तुटवडा भासत होता, तेंव्हा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने गरजू नागरिकांना ते ऑक्सिजन सिलिंडर मिळवून देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.

राजकारणातील कोणताही अनुभव नसताना, मोरे यांनी या पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. सगळीच कामे वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत नाहीत, याचा अर्थ ती कामे झाली नाहीत,असा होत नाही. श्री.मोरे मुळातच मितभाषी आहेत. त्यामुळे बोलण्यापेक्षा काम करण्यावर त्यांचा अधिक विश्वास आहे. दरम्यान मानसिंगराव गायकवाड दादा यांचा त्यांच्यावर गाढा विश्वास आहे. त्यांच्या माध्यमातून ,तसेच रणवीर युवा शक्ती च्या माध्यमातून त्यांनी समाजाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.

सामान्य जनतेला अपेक्षित असलेली कामे म्हणजे नळ पाणी पुरवठा व रस्ते हे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून ते पूर्णत्वास नेण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आहेत. अशा या नव्या उगवत्या नेतृत्वाला निधी आणि भक्कम पाठिंब्याची आवश्यकता आहे. तो राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड (दादा) यांच्या माध्यमातून त्यांना मिळेलच, याबाबत शंका नाही.

पुनश्च श्री उत्तमराव मोरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.