राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने वीजबिल कमी करण्यासंदर्भात निवेदन
बांबवडे : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने वाढीव वीज बिले कमी करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीस निवेदन देण्यात आले. सदरचे निवेदन उप अभियंता अभय शामराज यांनी स्विकारले.


यावेळी रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती चे अध्यक्ष समीर पाटील, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, सावे गावाचे तंटामुक्ती चे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, करुंगळे चे उपसरपंच प्रकाश कांबळे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष सुरज बंडगर व कार्यकर्ते उपस्थित होते.