राष्ट्रीय दलित महासंघाचे रमेश चांदणे यांना मातृशोक
बांबवडे : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील राष्ट्रीय दलित महासंघाचे अध्यक्ष रमेश चांदणे ( आप्पा) यांच्या मातोश्री लक्ष्मी बाबुराव चांदणे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. सा. शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज, व शाहुवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन दि.३/१२/२५ रोजी सकाळी दहा वाजता मलकापूर इथ आहे.
