रासी सीड्स कंपनीच्यावतीने बांबवडे पंचक्रोशीत पिकं पाहणी कार्यक्रम संपन्न
बांबवडे प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे पंचक्रोशी परिसरात रासी सीड्स प्रा.लि. या कंपनी च्या वतीने पिकं पाहणी कार्यक्रम संपन्न झाला असून, प्रत्यक्षात शिवारात जावून सुद्धा कंपनीच्या वतीने पाहणी करून मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भाताच्या जातीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

त्यामध्ये संकरीत भात ” RR X 360 ” या पिकाविषयी अधिक माहिती देण्यात आली. या भाताविषयी माहिती देताना, त्याची वैशिठ्ये सांगण्यात आलीत. त्यामध्ये हे पिकं ११० दिवसांच्या कालावधीत येते. त्याची उंची साडेतीन फुट इतकी असते. तसेच जनावरांना या काडाचा जनावरांसाठी उत्तम चारा म्हणून उपयोगात येतो. तसेच या काडाला फुटवे अधिक फुटल्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढते. गुंठ्याला दोन पोती भात असे उत्पादन येते. तसेच हे वाण रोगाला, किडीला प्रतिकार करण्याची क्षमता यामध्ये अधिक असते.

यावेळी कंपनी चे टेरीटरी मॅनेजर सर्वश्री कैलास रणवरे, प्रोजेक्ट ऑफिसर योगेश चौगुले उपस्थित होते.

तसेच महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र बांबवडे चे श्री महादेव मगदूम, साळशी फाटा येथील गुरुदत्त कृषी सेवा केंद्र चे मालक पद्मसिंह पाटील, खोतवाडी चे सरपंच श्री धोंडीराम ताय्याप्पा खोत, तसेच प्रगतशील शेतकरी श्री बाळू आकाराम खोत, बळीराम ज्ञानू खोत, सागर पाटील व शेतकरी यावेळी उपस्थित होते.