रिमझिम का होईना, पण तालुक्यात पावसाची सुरुवात
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात खऱ्या अर्थाने पावसाची सुरुवात झाली असल्याने, शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

अवघा जून महिना संपत आला असून, गेल्या दोन दिवसांपर्यंत पावसाचा पत्ता नव्हता. शेतकरी जमिनीची मशागत करून तयार होता. पण पावसाने मात्र ओढ दिली होती. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला होता. पण पाऊस दूरवर नजरेत येत नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता.

गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम का होईना, पावसाला सुरुवात झाली आहे. सूर्याच्या आगीने धरणी माता तप्त झाली होती. अशावेळी पावसाची नितांत गरज होती. आणि पावसाची सुरुवात झाली आहे. पावसाच्या सुरुवातीने जमीन शांत झाली आहे. झाडाझुडपांना उभारी मिळाली आहे. पावसाच्या या सुरुवातीने धरणीमाता शांत झाली आहे. निसर्गाचे सर्वार्थाने आभार.