रिलायंस , आत्म सौंदर्य व माऊली फुटवेअर च्या वतीने जीवनावश्यक कीट चे वाटप
बांबवडे : कोरोना संक्रमणाच्या काळात बांबवडे इथं स्थलांतरित झालेल्यांना बंद चा मोठा फटका बसला आहे. अशा स्थलांतरित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट चे वाटप रिलायंस फौंडेशन, आत्मसौंदर्य फौंडेशन व माऊली फुटवेअर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शामराव शेळके संकुल, इथं करण्यात आले.

शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे हि प्रसिद्ध व्यापारपेठ आहे. इथं दूरवरून लोकं येवून व्यापार करून, आपला उदरनिर्वाह चालवितात. परंतु कोरोना मुळे व्यापारपेठ बंद आहे. त्यामुळे अशा नागरिकांचे हाल सुरु आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी फुल ना फुलाची पाकळी मदत म्हणून मिळावी, या उदात्त हेतूने या संस्थांनी या कीट चे वाटप शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील, तसेच स्व.शामराव शेळके संकुल चे निर्माते त्रिवेणी इन्फ्रास्ट्रक्चर चे संचालक श्री अमित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आत्म सौंदर्य फौंडेशन च्या अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच माऊली फुटवेअर चे मालक श्री विठ्ठल पोवार यांनी आभार मानले. तसेच पोलीस पाटील संजय कांबळे यावेळी उपस्थित होते.